*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे जनसंपर्क अधिकारी लेखक कवी श्री विलास कुलकर्णी लिखित अप्रतिम गीतरचना*
*डिस्को गीत : वरात*
वरात सैराट वरात झोकात आली पुण्यात
वरात ही जोरात थिरकवा तुमचे पाय
बघता काय राव नाचते हाय वरमाय l
वरात सैराट वरात झोकात आली पुण्यात
नवरा बसला सजून धजून घोडीवर
घाई त्याला कधी चढतो बोहल्यावर
पायात पाय वऱ्हाडाला ताळमेळ नाय
बघता काय राव नाचते हाय वरमाय l
वरात सैराट वरात झोकात आली पुण्यात
ऍटम बॉम्ब फटाके मिरवणुक भारी
आतषबाजी चालली मार्गावर सारी
नवरदेव होणार लवकरच गरीब गाय
बघता काय राव नाचते हाय वरमाय l
वरात सैराट वरात झोकात आली पुण्यात
वऱ्हाडी झाले आज डिस्को दिवाणे
येत नाही धड तरी गाऊ लागले गाणे
नवरदेव नाचू लागला सांगा करू काय ?
बघता काय राव नाचते हाय वरमाय l
वरात सैराट वरात झोकात आली पुण्यात
विलास कुलकर्णी
मीरा रोड
7506848664
