You are currently viewing गुलमोहर…

गुलमोहर…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री उज्ज्वला सहस्त्रबुद्धे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*गुलमोहर…*

 

गुलमोहरा, गुलमोहरा,

फुलवलास तुझा पिसारा!

जेव्हा पसरून येतोस तू,

उधळीत तुझा रंग सारा!.१

 

पानां पेक्षा रंग बेरंगी,

फुलांचा गुच्छ तो बहुढंगी!

उष्ण झळा उन्हाच्या झेलीत,

उभा रहातो तू पहात संधी!..२

 

ना गंध, ना रूप दिसेना,

तुझ्याच या पुष्प गुच्छांना!

तरीही माझे प्रेम तुझ्यावर,

झेलतो तू रविकिरणांना!..३

 

वर्षातील ते सारे महिने,

असतोस तू उभा एकाकी!

रवि राजाच्या सोबत दिसे,

रंग तुझा तो एकाएकी!..४

 

तुझ्या कडून शिकत रहावे,

जीवन अपुले कसे असावे,

कधी निष्पर्ण,तर कधी मोहक,

जसे मिळेल ते जगत रहावे!..५

 

उज्ज्वला सहस्रबुद्धे, पुणे

प्रतिक्रिया व्यक्त करा