You are currently viewing योगा स्पर्धेत शर्वरी माळी हिचे यश

योगा स्पर्धेत शर्वरी माळी हिचे यश

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

मिणचे येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय योगा स्पर्धेत श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलची विद्यार्थिनी कु. शर्वरी श्याम माळी हिने ट्रॅडिशनल ग्रुप प्रकारात प्रथम क्रमांक, आर्टिस्टिक प्रकारात द्वितीय क्रमांक व ट्रॅडिशनल वैयक्तिक प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला. तिला प्रशालेचे क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शेखर शाह तर प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस.एस. गोंदकर, संस्थेचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, चेअरमन कृष्णा बोहरा, व्हाईस चेअरमन उदय लोखंडे, ट्रेझरर राजगोपाल डाळ्या, सेक्रेटरी बाबासाहेब वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन मारुतराव निमणकर या सर्वांचे सहकार्य लाभले.‌

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + 17 =