सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ चे आयोजन….
_*यशवंतराव भोसले सैनिक स्कूलचा अनोखा उपक्रम….*_
सावंतवाडी
_विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडावृत्ती, आत्मविश्वास व स्पर्धात्मक भावना विकसित करण्याच्या उद्देशाने यशवंतराव भोसले सैनिक स्कूल, भोसले नॉलेज सिटी यांच्या वतीने ‘ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६’ या अभिनव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ३० व ३१ मे २०२६ रोजी भोसले नॉलेज सिटी परिसरात ही स्पर्धा संपन्न होणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारची ट्रायथलॉन स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे._
_या स्पर्धेत रनिंग, सायकलिंग आणि शूटिंग या तीन प्रकारांचा समावेश असणार आहे. विद्यार्थ्यांना वयोगटानुसार ८ ते १० वर्षे, १० ते १२ वर्षे आणि १२ ते १४ वर्षे अशा गटांमध्ये सहभागाची संधी उपलब्ध आहे. ३० मे रोजी पात्रता फेरी होणार असून, ३१ मे रोजी अंतिम फेरी रंगणार आहे. पात्र ठरलेल्या स्पर्धकांना अंतिम फेरीत आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे._
_ट्रायथलॉन ही एक बहुआयामी स्पर्धा असून त्यामध्ये सहभागी स्पर्धकांना तीन वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये — रनिंग, सायकलिंग आणि शूटिंगमध्ये सहभाग घ्यावा लागतो. प्रत्येक प्रकारात स्पर्धकांच्या कामगिरीनुसार गुण दिले जातील. तिन्ही प्रकारांमधील एकत्रित गुणांच्या आधारे सर्वोत्तम सरासरी व उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकाला विजेता घोषित करण्यात येणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा केवळ वेगाची नव्हे तर सहनशक्ती, अचूकता आणि सातत्यपूर्ण कामगिरीची खरी कसोटी ठरणार आहे._
_विजेत्यांना आकर्षक रोख पारितोषिके, ट्रॉफी, पदके व प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. स्पर्धा सर्व मुलांसाठी खुली असून व्यावसायिक प्रशिक्षण, सुरक्षिततेवर भर आणि अविस्मरणीय अनुभव अशा वैशिष्ट्यांमुळे मुलांना एक उत्तम व्यासपीठ लाभणार आहे. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी ९६२३३१०६९४ / ९१६७०७७९४० या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे._
