*सिंधुदुर्ग जिल्ह्यात, काँग्रेसची सर्व तालुक्यात पुनर्बांधणी ;*
*तालुका स्थरावरील पदाधिकारी निवडीसाठी १०० पेक्षा जास्त नावांच्या शिफारसी*
सिंधुदुर्ग
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका स्तरावर पुनर्बांधणी करण्यासाठी नवीन पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली असून, या निवड प्रक्रियेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक, कुडाळ येथील एम आय डी सी रेस्ट हाऊस येथे झाली. या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व तालुका स्थरावरील निवड प्रक्रियेचे समन्वयक श्रीरंग बरगे यांनी जिल्ह्यातील सर्व ब्लॉक व वेगवेगळे विभाग अध्यक्षांची निवड करण्यासाठी पदाधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. जिल्ह्यातील बहुतांशी कार्यकर्त्यांशी संवाद साधून १०० हून अधिक पदाधिकाऱ्यांच्या नेमणूकीच्या शिफारशी प्रदेश काँग्रेसकडे करण्यात आल्या. तसेच संघटन बळकटीकरणाच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. संघटन सृजन अभियानाच्या माध्यमातून कॉंग्रेस पक्षाला सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवसंजीवनी मिळणार असून पक्षाची वाढ अधिक वेगाने होण्यास मदत होईल असा विश्वासही बरगे यांनी यावेळी व्यक्त केला.
लेकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या कामाने प्रभावित होऊन नव्या जोमाने काम करण्याची इच्छा कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली असून आगामी काळात कॉंग्रेस पक्षाला याचा मोठा फायदा होईल असा विश्वासही समन्वयक श्रीरंग बरगे यांनी व्यक्त केला.
या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष विलास गावडे, माजी जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, प्रदेश प्रतिनिधी माजी नगराध्यक्ष अॅड दिलीप नार्वेकर, जिल्हा बॅंक संचालक मेघनाद धुरी, विजय प्रभू, सावंतवाडीचे नगरसेवक तौकिर शेख,रविंद्र म्हापसेकर,चंद्रशेखर जोशी,अभय मालवणकर,गुणाजी गवस,प्रदिप मांजरेकर, अभय मालवणकर, बाळू मेस्त्री,अजिंक्य गावडे, सच्चिदानंद बुगडे, संजय लाड, केतनकुमार गावडे,प्रथमेश परब, प्रवीण वरूनकर, प्रवीण आचरेकर, चंदन पांगे, कृष्णा धाऊसकर, सुधीर मल्हार,तबरेज शेख,पराग माणगावकर, आय.वाय.शेख, देवानंद लुडबे,समीर वंजारी, शांताराम नेवरेकर, रविकांत वळंजू अशोक राणे, अहमद बोबडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
