गणित प्रज्ञा परीक्षेत सावंतवाडी शाळा नं. 4 चे विद्यार्थी सिल्व्हर कॅटेगिरीत
सावंतवाडी
महाराष्ट्र राज्य गणित अध्यापक मंडळ मार्फत एप्रिल २०२५ घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक सावंतवाडी शाळा नं. 4 शाळेच्या इयत्ता पाचवीतील कु. पार्थ अशोक बोलके, कु. हार्दिक अनिल वरक व कु. वीरा राजीव घाडी यांनी राज्याच्या सिल्व्हर कॅटेगिरीत स्थान मिळविले आहे. त्यामुळे त्यांचे अभिनंदन होत आहे . अतिशय कठीण समजल्या जाणाऱ्या या परीक्षेत या तिन्ही मुलांनी गुणवत्ता यादीत मिळविलेले स्थान हे निश्चितच कौतुकास्पद आणि शाळेसाठी अभिमानास्पद आहे.तीनही मुलांनी प्रचंड मेहनत करून हे यश मिळविले आहे. अशा भावना व्यक्त करीत त्यांचे मार्गदर्शक शिक्षक श्री महेश पालव यांनी अभिनंदन केले आहें .