*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ.सरिता परसोडकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*यमुनेच्या निळसर डोही*
पेंद्या ,सुदामा, वज्र, वाकड्या, यारे सारे खेळूया
यमुनेच्या त्या निळसर डोही, चला गड्या रे पोहूया..
नको जाया तिथे कान्हा ,सर्प आहे कालिया
विटि दांडू चा खेळ मौजेचा, जाईल रे विलया
ऐका सांगतो तुम्हा सवंगड्या, ठाण तिथे मांडूया
यमुनेच्या त्या निळसर डोही, चला गड्या पोहूया..
नको म्हणता ऐकले नाही, गेली ना विटी डोहात
थांब सुदामा घेऊन येतो ,
पडलो तिच्या मोहात
कालियाचे स्वागत करण्या, चला उभे राहूया
यमुनेच्या त्या निळसर डोही, चला गड्या रे पोहुया..
अरे कुठे गेला आपला, कान्हा दिसेना झाला
बघा कालियाच्या फनीवर ,उभा कसा राहिला
चला अशा जनार्दनाचे ,आपण मिळून गीत गाऊया
यमुनेच्या त्या निळसर डोही, चला गड्या रे पोहुया ..
कर्ता आणि करविता , तो जगाचा श्रीहरी
अहंम मडकी आणि फोडतो, मोहाच्या घागरी
त्याच्या चरणाशी चला , सारे लीन होऊया
यमुनेच्या त्या निळसर डोही, चला गड्या रे पाहूया..
सौ सरिता परसोडकर..✍🏻
