You are currently viewing कॅमेर्‍यासोबतचं..माझं जगणं..!!
Oplus_16908288

कॅमेर्‍यासोबतचं..माझं जगणं..!!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी बाबा ठाकूर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*कॅमेर्‍यासोबतचं..माझं जगणं..!!*

 

जगाच्या रहाटीतून कॅमेर्‍यानेचं

सोडवलेत…..विघ्नांचे तिढे

मर्म…स्तोमाचे ओळखून

दिलेत …संयमाचे धडे..

 

प्रतिबिंबातून ओझे वाहून

कर्मांचा.. जाणता दरकदार

अगांतुक संकटांवर.. फोकस

मुख्तार… वृतींचा शिरस्तेदार..

 

बहाणा… नीतीचा बघून

कॅमेर्‍यानेच शटरस्पीड वाढवली

स्नेहभावात..रित मोडून नियतीने

बोच-या व्यथांची …सवय मोडली

 

मैत्रिकी..प्राणांपाड ..जपत जपत

हिरोपंती..कॅमे-यानेचं शिकवली

बिंबित प्रचितीतून… प्रतिबिंबाच्या

स्वच्छंदी ….अंतरंगात भिनली..

 

ओज…..पांडित्याची देउनी

तराण्यांसवे व्यक्तीमत्व खुलविले

माझ्या आईनंतर…मला

कॅमेर्‍यानेचं ..आजवर सजविले

 

बाबा ठाकूर.

प्रतिक्रिया व्यक्त करा