You are currently viewing जगरहाटी

जगरहाटी

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*जगरहाटी*

~~~~~~~~

खरेच काही कळत नाही

कुणी समजून घेतच नाही

 

जिथेजिथे प्रेम करीत जावे

तिथे प्रेमार्थ कळतच नाही

 

आजकाल भावशून्य सारे

भाव नि:स्वार्थी कुठे नाही

 

भौतिक प्रलोभनांची गर्दी

सुखासक्ती ती संपत नाही

 

वोखट्या माया ममतेपायी

सख्यत्वाची जाणीव नाही

 

निष्पाप निरागस मन हे वेडे

हेवे दावे त्याच्या लेखी नाही

 

कुणास किती स्मरत रहावे

विस्मरण कुणाचे होत नाही

 

आज इथे जगरहाटी वेगळी

अर्थ जगण्याचा कळत नाही

~~~~~~~~~~~~~~~

. *©️विगसातपुते*

प्रतिक्रिया व्यक्त करा