You are currently viewing पूर्वीच्या शाळा ह्या खऱ्या अर्थाने ज्ञानमंदिरे होती● …दिलीप बेतकेकर..

पूर्वीच्या शाळा ह्या खऱ्या अर्थाने ज्ञानमंदिरे होती● …दिलीप बेतकेकर..

●पूर्वीच्या शाळा ह्या खऱ्या अर्थाने ज्ञानमंदिरे होती●
…दिलीप बेतकेकर..

पूर्वीच्या शाळा या नुसत्या इमारती नव्हत्या तर शिक्षणासोबत संस्कार करणाऱ्या आणि जीवनाला आकार देणार्‍या शाळा होत्या.आणि अशा शाळांवर त्या काळातील पालकांची श्रध्दा आणि निष्ठा होती.भले त्या काळात शाळांसाठी आजच्या सारख्या भौतिक सुविधा नसतील पण जीवनाचा खरा अर्थ समजून सांगणारे गूरूजन होते.त्या नुसत्या इमारती नव्हत्या तर टाळ बोले चिपळीला नाच माझ्या संघ,एक एक खांब वारकरी होईल ,आजच्या मुलानां जर आपण मूल्यशिक्षणाचे धडे दिलेत आणि तसे शुध्द आचरण आपण ठेवले तर निश्चित आजच्या मुलांची उर्जा ही सकारात्मक विचार करू शकते असे प्रेरणादायी विचार विद्याभारतीचे जेष्ठ कार्यकर्ते व समुपदेशक श्री दिलीप बेतकेकर यांनी सरस्वती विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज,कुडासेच्या माजी विद्यार्थी संघाच्या वार्षिक स्नेहसंमेलनात मांडले.कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते संबोधित करत होते.
माजी विद्यार्थी संघाचे सचिव श्री दत्तप्रसाद देसाई यानी संघाच्या माध्यमातून शाळेसाठी सुमारे अठरा लाखाचा निधी जमवून अनेक भौतिक सुविधा निर्माण केल्या असून यापुढील काळात या शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी माजी विद्यार्थी संघ जोमाने काम करेल असा आशावाद व्यक्त केला.
माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी श्री दादा देसाई व संघाचे अध्यक्ष श्री संदेश तळणकर यांनी पालक,शिक्षक आणि दाते यांच्या सहकार्याने ही शाळा गुणवत्तेत अव्वल असून बारावी शास्त्र शाखेचा शंभर टक्के निकाल लागला असून माध्यमिक शालांत परीक्षेतही मोठे यश प्राप्त केल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित अनेक माजी विद्यार्थ्यांनी या शाळेप्रती असलेली बांधिलकी व प्रेम आपल्या संबोधनातून व्यक्त केल्या.
सरस्वती विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्तै आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड.नकुल पार्सॅकर यानी आपण या ज्युनियर कॉलेजमध्ये पंचेचाळीस वर्षापूर्वी शिकायला होतो.त्या काळातील या कुडासे गावातील सामाजिक परिस्थितीती आणि त्या काळात त्यासाठी करावा लागणारा संघर्ष यामुळेच जे या शाळेत अनुभवले त्याच उपयोग मला माझ्या पुढील वाटचालीस झाला.अनुभवातूनचं आपला व्यक्तीमत्व विकास होतो.कोणत्याही प्रकारचे आव्हान समोर असेल तर त्यासाठी संघर्ष करण्याच्या मानसिकतेची बिज ही याच शाळेत रुजली .त्यामुळे या कार्यक्रमात मी अध्यक्ष असलो तरी आता व्यक्त होताना या शाळेतील पंचेचाळीस वर्षापूर्वीच अनुभूती एक माजी विद्यार्थी म्हणून मांडता आली.आज तंत्रज्ञानाच्या युगात मानवी स्वभावा मध्ये झपाट्याने होणारे बदल आणि त्यामुळे दिवसेंदिवस निर्माण झालेल्या अनेक गंभीर समस्या याचा गांभीर्यपूर्वक विचार आज करण्याची गरज आहे.यापुढील काळात या प्रशालेचा माजी विद्यार्थी म्हणून शाळेच्या भविष्यातील नवनवीन संकल्पनांना राबवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन अँड.नकुल पार्सॅकर यानी दिले.
यावेळी श्री प्रकाश कुडासकर,संतोष देसाई, रामदास मेस्ञी, नंदकिशोर नाईक, सौ तळणकर आदि माजी विद्यार्थी उपस्थित होते.सुञसंचालन सचिव श्री देसाई यानी केले तर आभार प्रशालेचे मुख्याध्यापक जालिंदर शेंडगे यानी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा