You are currently viewing ऑनलाईन मीटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात २५ जुलैला फोंडाघाट MSEB कार्यालयासमोर आंदोलन

ऑनलाईन मीटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात २५ जुलैला फोंडाघाट MSEB कार्यालयासमोर आंदोलन

ऑनलाईन मीटर बसविण्याच्या निर्णयाविरोधात २५ जुलैला फोंडाघाट MSEB कार्यालयासमोर आंदोलन

अजित नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन; आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून जुन्या पद्धतीचे मीटर बसविण्याची मागणी

फोंडाघाट :

वीज ग्राहकांच्या घरांमध्ये ऑनलाइन (स्मार्ट) मीटर बसविण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत येत्या २५ जुलै रोजी फोंडाघाट येथील महावितरण (MSEB) कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. सामाजिक कार्यकर्ते अजित नाडकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार असून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून वीज ग्राहकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात येणार आहेत.
यावेळी ऑनलाइन मीटरऐवजी पूर्वीप्रमाणेच पारंपरिक वीज मीटर बसवावेत, अशी प्रमुख मागणी आंदोलनातून करण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांवर आर्थिक भार पडण्याची तसेच भविष्यात विविध अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त करत या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे.
या आंदोलनात परिसरातील सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा, असे आवाहन अजित नाडकर्णी यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा