You are currently viewing जीवनदान विशेष शाळेला समाजकल्याण सभापती रुहिता तांबे यांची सदिच्छा भेट
Oplus_16908288

जीवनदान विशेष शाळेला समाजकल्याण सभापती रुहिता तांबे यांची सदिच्छा भेट

विशेष विद्यार्थ्यांशी साधला संवाद; शैक्षणिक सुविधा, पुनर्वसन व भविष्यातील गरजांचा घेतला आढावा

झाराप / कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाच्या सभापती सौ. रुहिता तांबे यांनी झाराप येथील जीवनदान विशेष शाळेला सदिच्छा भेट देऊन शाळेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा समाजकल्याण अधिकारी श्री. कांबळे तसेच जिल्हा दिव्यांग कल्याण सक्षमीकरण अधिकारी श्री. परीट उपस्थित होते.

शाळेत आगमनानंतर विद्यार्थ्यांनी फळ्यावर सुंदर हस्ताक्षरात स्वागतपर संदेश लिहून मान्यवरांचे उत्साहात स्वागत केले. संस्थेच्या वतीने सौ. रुहिता तांबे यांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

यानंतर त्यांनी विशेष विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शिक्षण, पुनर्वसन तसेच विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि संस्थेच्या प्रतिनिधींशी बैठक घेऊन विद्यार्थ्यांना उपलब्ध सुविधा, शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच भविष्यातील गरजांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

विशेष विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी समाजकल्याण विभागामार्फत आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही सौ. रुहिता तांबे यांनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा