You are currently viewing डेगवे प्रशालेच्या गौरी देसाई हिचे माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश..

डेगवे प्रशालेच्या गौरी देसाई हिचे माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश..

सावंतवाडी

माध्यमिक विद्यालय डेगवे प्रशालेतील कुमारी गौरी अभय देसाई हिने इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. माध्यमिक विद्यालय डेगवे प्रशालेतील विद्यार्थिनी कु.गौरी अभय देसाईने माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ग्रामीण विभागातून तालुक्यात २१ वा क्रमांक पटकावला आहे. गौरीच्या या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका माधवी सावंत यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तसेच धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई या संस्थेचे कार्याध्यक्ष मिलिंद तोरसकर, सचिव कल्पनाताई तोरसकर तसेच सर्व कार्यकारिणी सदस्य यांनीही गौरीचे अभिनंदन केले आहे. तसेच शालेय समिती, सर्व संस्था पदाधिकारी आणि ग्रामस्थ मंडळी डेगवे व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी देखील गौरी देसाईच्या उज्वल यशाबद्दल तिचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 6 =