You are currently viewing ओपन जिम प्रकल्पाचा शिरवंडे, निरोम, बुधवळे या गावात शुभारंभ

ओपन जिम प्रकल्पाचा शिरवंडे, निरोम, बुधवळे या गावात शुभारंभ

मालवण:

 

केंद्रीय मंत्री नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, माजी खासदार निलेश राणे, प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांच्या माध्यमातून शासन स्तरावर मंजूर झालेल्या ओपन जिम प्रकल्पाचा शुभारंभ मालवण तालुक्यातील शिरवंडे, निरोम, बुधवळे गावात बुधवारी करण्यात आला.

ओपन जिम प्रकल्प मंजुरीत माजी सभापती सुनील घाडीगांवकर, माजी वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, बाळा राऊत यांचा पाठपुरावा महत्वाचा ठरला, अशी माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे. प्रकल्प शुभारंभ प्रसंगी माजी सभापती सुनील घाडीगांवकर यांसह गुरुदास घाडीगांवकर, अविनाश (बाळा) राऊत, बुधवळे, निरोम सरपंच राजू राऊत, संजय कदम, सुभाष कदम, आनंद कदम, सुनील कदम, नारायण कदम, विश्वास हिर्लेकर, तुषार हाटले, संदीप कुवळेकर, संतोष (राजू) घागरे, लक्ष्मण (भाऊ) पडवळ, रवींद्र घाडी, संभाजी गोलतकर, रवींद्र मुणगेकर, संतोष हिर्लेकर यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा