You are currently viewing प्रेम कहाण्या घडवू सखे नव्या

प्रेम कहाण्या घडवू सखे नव्या

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. सरिता परसोडकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*प्रेम कहाण्या घडवू सखे नव्या*

 

 

तुझ्या माझ्या प्रेमात या अटी कशाला हव्या

रोज रोज प्रेम कहाण्या घडवू सखे नव्या.. !!ध्रुवपद!!

 

 

नव्या कहाणीत बघ मग येईल मजा भारी

हरवून जाऊ आपण दोघे दुःखे सारी

येईल नवीन पाहुणा रडून करेल गयावया

रोज रोज प्रेम कहाण्या घडवू सखे नव्या..!!१!!

 

नको झळ सोसाया अटीतटींची गं त्याला

दोघे मिळून जपू आपण त्याच्या अस्तित्वाला

बघ कसा होईल तो आपला शहाणा पेशवा

रोज रोज प्रेम कहाण्या घडवू सखे नव्या..!!२!!

 

तुझ्या माझ्या प्रेमाला या सांग काय नाव देऊ

नको उपमा कशाची आपण जोडीनच राहू

कुंतली माळण्या आणू का चंद्र तारका ह्या नव्या

रोज रोज प्रेम कहाण्या घडवू सखे नव्या..!!३!!

 

प्रीतीच्या कहाणीत मी राजा तू गं सखे राणी

नाही येऊ देणार कधी तुझ्या डोळ्यात ते पाणी

मांडशील ना रोज संसारात छान तो भादवा

रोज रोज प्रेम कहाण्या घडवू सखे नव्या..!!४!!

 

तुझ्या माझ्या प्रेमात या अटी कशाला हव्या

रोज रोज प्रेम कहाण्या घडवू सखे नव्या!!

 

सौ सरिता सुहास परसोडकर पुसद✍🏻

प्रतिक्रिया व्यक्त करा