You are currently viewing विना परवाना ९९ वृक्षांची तोड ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

विना परवाना ९९ वृक्षांची तोड ; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

इचलकरंजीत वृक्षतोड रोखण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

इचलकरंजी येथील सांगली मार्गावर विना परवाना सुमारे ९९ वृक्षांची तोड केल्याप्रकरणी चौघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान वृक्षतोड रोखणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सामाजिक कार्यकर्त्याने याबाबत तक्रार दिल्यावर बाग पर्यवेक्षकाने गावभाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याने जोरदार चर्चा शहरात सुरू आहे.

इचलकरंजी येथील सांगली मार्गावर गोंदकर मळा आहे. या पडीक जागेत १८ मे रोजी वृक्षतोड सुरू होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष हत्तीकर यांनी नगरपालिकेचे प्रभारी बाग पर्यवेक्षक संपत चव्हाण यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता अभिजीत शामराव वडींगे यांच्यासह चौघेजण कटरने बांभळी आणि काटेरी झाडे तोडत असल्याचे स्पष्ट झाले. या पाहणीत २ ते १० फुटांची ९९ झाडे तोडल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे बाग पर्यवेक्षक संपत चव्हाण यांनी याप्रकरणी सोमवारी रात्री महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडाचे संरक्षण, जतन अधिनियम १९७५ चे कलम २१ नुसार अभिजीत वडींगे याच्यासह चौघांच्या विरोधात गावभाग पोलीस ठाण्यात वृक्षतोड केल्याप्रकरणी तक्रार दिली आहे.त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा