You are currently viewing वाघोटन नदी इशारा पातळीजवळ किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा

वाघोटन नदी इशारा पातळीजवळ किनाऱ्यावरील गावांना सतर्कतेचा इशारा

सिंधुदुर्गनगरी

खारेपाटण पुलाजवळ आज सायंकाळी 5 वा. मोजलेल्या पाणीपातळीनुसार वाघोटन नदीची पातळी 8.250 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली आहे. या नदीची इशारापातळी 8.500 मीटर असून धोका पातळी 10.500 मीटर आहे. सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर वाघोटन नदीच्या किनाऱ्यावरील गावांनी सतर्क रहावे.

            तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे 38.500 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर  धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. तर कर्ली नदीची पातळी भंकसाळ नदी पुलाजवळ 7 मीटर आहे. कर्ली नदीची इशारा पातळी 9.910 मीटर आणि धोका पातळी 10.910 मीटर इतकी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा