You are currently viewing कालिंदीच्या काठावरती

कालिंदीच्या काठावरती

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

 

*कालिंदीच्या काठावरती*

 

शोधते तुला अवती भवती

कालिंदीच्या काठावरती!!

 

अशी कशी घातली मोहिनी

अवघे गोकुळ भुलले सदनी

कृष्ण भेटीला गोपी झुरती!!१

कालिंदीच्या काठावरती….

 

निमित्य झाले दहीदूध लोणी

तवरूप नेत्री घेऊ भरूनी

मोहक रुपडे बघता तृप्ती!!२

कालिंदीच्या काठावरती…

 

तुजवीण हरि रे शून्य भासते

पावा ऐकुनी तन मोहरते

दिव्यस्वरांची मनात दीप्ती!!३

कालिंदीच्या काठावरती…

 

तुझ्या भक्तीचा रंग आगळा

तनमनात श्रीकृष्ण सावळा

पंचप्राणांची तुला आरती!!४

कालिंदीच्या काठावरती….

 

अरुणा दुद्दलवार@✍️

०००००००००००००००००

प्रतिक्रिया व्यक्त करा