API जयदीप पाटील यांच्याकडे तात्पुरता कार्यभार; पोलिस वर्तुळात चर्चांना उधाण
कुडाळ :
कुडाळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची अचानक बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी सहाय्यक पोलिस निरीक्षक (API) जयदीप पाटील यांच्याकडे तात्पुरता कार्यभार सोपविण्यात आला आहे. या बदल्यामुळे पोलिस वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
आपल्या कार्यकाळात अनेक कठीण गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात मगदूम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेषतः गेल्या एका वर्षात त्यांनी गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी नियंत्रण मिळवत परिसरात धाक निर्माण केला होता.
मगदूम यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या पदाचा तात्पुरता कार्यभार API जयदीप पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे. मात्र, ही बदली नेमक्या कोणत्या कारणामुळे करण्यात आली याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. कार्यक्षम अधिकाऱ्याची अचानक झालेली बदली हा सध्या कुडाळ परिसरातील चर्चेचा विषय ठरत आहे.
