*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*दैवयोग भाळीचा*
~~~~~~~~~~
आज मिटल्या पापण्यात
आठवांचाच ओघळ तूझा
क्षण सारेच तुझे कृपावंती
हृदयात जागर सदैव तुझा
व्याकुळलेल्या अंतरंगात
गंधाळणारा दरवळ तुझा
कां ? उगा शोधावे मी तुला
चराचराला भावस्पर्श तुझा
याहूनी दुजी सुखदा कोणती
मनवृंदावनी तेवतो दीप तुझा
भक्तीगीतांचा शब्दप्रसाद सुंदर
दिंडीत रंगरंगला रे अभंग तुझा
मी स्मरताना गुणगुणतो गातो
पंचतत्वी विठ्ठल विठ्ठल माझा
~~~~~~~~~~~~~~~
*©️वि.ग. सातपुते*
.
