घे भरारी फाउंडेशनच्या दांडिया रास कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद!…..
पारंपरिक वेशभूषा, गरबा-दांडियाच्या तालावर महिलांचा जल्लोष; विविध स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिके
सावंतवाडी
घे भरारी फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या वतीने शनिवार, दि. १७ ऑक्टोबर रोजी आर.पी.डी. हायस्कूलच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेला दांडिया रास कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. पारंपरिक वेशभूषा, आकर्षक नृत्याविष्कार आणि गरबा-दांडियाच्या तालावर रंगलेल्या या सोहळ्याने उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सामाजिक कार्यकर्त्या सौ. वेदिका विशाल परब उपस्थित होत्या. त्यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढावा तसेच सामाजिक एकोपा आणि आनंदाचे वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात विविध वयोगटांतील महिलांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. उत्कृष्ट नृत्य, आकर्षक वेशभूषा, केशरचना, समूह नृत्य यांसारख्या विविध प्रकारांमध्ये सहभागी स्पर्धकांनी आपले कौशल्य सादर केले.
विविध स्पर्धांतील विजेते पुढीलप्रमाणे :
*बेस्ट एनर्जेटिक **परफॉर्मन्स :* प्रथम – सपना संदीप विरनोडकर, द्वितीय – वैष्णवी विराज मसुरकर.
*बेस्ट डान्सर :* प्रथम – सुनिता अजय गुजराती, द्वितीय – पौर्णिमा शिवराम परब, तृतीय – सरोज रमेश माळी, चतुर्थ – यज्ञा योगेश सावंत, पाचवा क्रमांक – शिवानी तूयेकर.
*बेस्ट ग्रुप डान्सर : जान्हवी सारंग ग्रुप.*
*बेस्ट कॉस्च्युम :* प्रथम – अनिता पृथ्वीराज चव्हाण, द्वितीय – पूजा हनुमंत धोत्रे, तृतीय – पुनम नागेश बिद्रे, चतुर्थ – शीला गंगाराम चव्हाण.
*बेस्ट हेअर स्टाईल :* प्रथम – सावी सिद्धेश सावंत, द्वितीय – अन्वी अनंत मिस्त्री, तृतीय – मानसी मनोज सावंत, चतुर्थ – वर्षा महादेव दळवी.
*लहान मुलांमधील बेस्ट परफॉर्मन्स :* प्रथम – युक्ता महेश गावडे, द्वितीय – गायत्री पनवेलकर.
*बेस्ट सीनियर डान्सर :* प्रीती जयप्रकाश डोंगरे.
लकी ड्रॉमधील १४ भाग्यवान विजेते
कार्यक्रमाचे आणखी एक आकर्षण ठरलेल्या लकी ड्रॉमध्ये संजना पार्सेकर यांनी नथ, तर शिल्पा सावंत यांनी मोत्याचा सेट हे बक्षीस पटकावले.
तसेच सीमा रेडीज, ज्योती मुद्राळे, सोनाली सरमळकर, शितल प्रवीण बांदेकर, युक्ता सचिन राणे, अयान मसुरकर, योगिता संतोष कोरगावकर, रेणुका तूयेकर, साक्षी दाभोलकर, ऋचा वाळके, प्राजक्ता दाभोलकर आणि अनिता म्हापसेकर हे अन्य भाग्यवान विजेते ठरले.
विविध स्पर्धांमधील विजेत्यांचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. मेघना प्रकाश राऊळ यांनी केले.
महिलांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण सभागृह आनंद, उत्साह आणि जल्लोषाने भारावून गेले होते. महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच परस्पर स्नेह, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा हा दांडिया रास सोहळा उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला. कार्यक्रमासाठी संस्थापिका अध्यक्षा मोहिनी मडगावकर अध्यक्षा ज्योती दुधवडकर सल्लागार शारदा गुरव कार्याध्यक्ष रिया रेडीज उपाध्यक्ष मेघना राऊळ सचिव मेघा डूबळे खजिनदार मेघना साळगावकर त्याचबरोबर घे भरारीच्या सदस्या रेखा कुमटेकर सलोनी वंजारी संध्या पवार स्वप्नाली कारेकर वंदना मडगावकर सीमा रेडीज गीता सावंत वैष्णवी बांदेकर साक्षी परुळेकर मनीषा नवांगुळ गीता लोहार मनीषा मिशाळ प्रीती काजारे दिपाली नेवगी अनिता म्हापसेकर दिपाली तांडेल शिल्पा जाधव अरुणा नाईक समिधा मडगावकर नूतन जोशी शिल्पा चव्हाण सिद्धी वारंग या सर्व सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले
