You are currently viewing मालवण मध्ये शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी चे उद्घाटन

मालवण मध्ये शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी चे उद्घाटन

मालवण तालुक्यातील कट्टा वराड येथे 3 ऑगस्ट रोजी शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी लि. मालवण या कंपनीचे उद्घाटन झाले. शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी लि. मालवण व मीरा क्लिन फ्युएल्स लि. मुंबई यांच्या संयुक्त विद्यामाने मालवण तालुक्यामध्ये जैव इंधन (Bio-CNG) प्रकल्प होऊ घातलेला आहे.

या प्रकल्पाचे उद्दीष्ट भारताला 2030 पर्यंत इंधनामध्ये परिपुर्ण बनविणे हे आहे. मालवण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात सुपर नेपीयर गवताच्या लागवडी साठी बियाणे देण्यात येणार असुन शेतकऱ्यांच्या उत्पनामध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे. कंपनी मार्फत सदर गवताची खरेदी होणाऱ असून त्यापासून सी.एन्. जी प्रकल्पातुन जैव इंधन तयार करण्यात येणार आहे. सदर जैव इंधन प्रकल्पामुळे मालवण तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात रोजगार क्रांती होणाऱ आहे. तरी या प्रकल्पामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या संपर्क व सहभाग व्हावा या उद्देशाने या कार्यालयाचे उद्घाटन मा. कार्तिक रावल प्राइम बि.डी.ए व मा. सागर सांगेलकर बि.डी.ए यांच्या हस्ते पार पडले.

सदर उद्घाटनप्रसंगी मा. कार्तिक रावल यांनी MCL ची कार्यपद्धती, ध्येय-उद्दिष्ट्ये व त्यांच्या मुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे याबद्दल उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवस्वप्न शेतकरी उत्पादक कंपनी लि. मालवण चे संचालक वैभव पवार, स्वप्नाली गावडे, हेमंत हळदणकर, अभिजित परब, विरेश पवार, अनिरुद्ध मेस्री, प्रणय सावंत, राजाराम सावंत शिवराम परब व साई परब उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा