You are currently viewing या पुढे रुमालाला मास्क समजले जाणार नाही, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

या पुढे रुमालाला मास्क समजले जाणार नाही, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आदेश

सिंधुदुर्गनगरी

संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रीडा व मनोरंजनविषयक क्षेत्रातील कार्यांना कोविड 19 सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळेनुसार खुले करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिले.

या आदेशात म्हटले आहे. राज्य शासनाकडे गेल्या काही महिन्यांमध्ये कोविड 19 पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद सातत्याने कमी प्रमाणात होत आहे. तसेच देशातील व शेजारच्या राज्यांतील कोविड 19 रुग्णसंख्येच्या आलेखामध्ये निरंतर व सातत्याने घट होत आहे. आवश्यक निर्बंधांचे विविध आस्थापनांकडून कोविड 19 विषयक निर्बंधाचे पालन करण्यात येत असलेल्या शिस्तीमुळे तसेच बहुसंख्य जनतेने कोविड अनुरूप वर्तन विषयक शिस्त बाळगण्यामुळे हे सर्व यश प्राप्त झाले आहे. राज्यातील व देशातील लसीकरण मोहिमेला देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून आले आहे आणि त्यामुळे सार्वजनिक तसेच खाजगी आरोग्य विषयक पायाभूत सुविधांवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होण्यास हातभार लागला आहे. ही वस्तुस्थिती विचारात घेता, साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती निवारण कायदा, २००५ नुसार महाराष्ट्र शासनाने आर्थिक, सामाजिक, मनोरंजन व सांस्कृतिक क्षेत्रावरील निर्बंध पूर्णत: लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी खुले करण्याकरिता निर्देश पारित केलेले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seven − five =