स्थानिक डॉ.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीचे सदस्य व मिशन आयएएस शिबिरातील उत्कृष्ट व्याख्याते व संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या व्याख्यानाने वेड लावणारे व दररोज संपूर्ण महाराष्ट्रात कुठे ना कुठे आपले व्याख्यान देणारे सुप्रसिद्ध व्याख्याते सांगलीचे श्री वसंत हंकारे हे मंगळवार दिनांक पाच मे रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. गेल्या पंधरा वर्षापासून ते डा.पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीशी जुळलेले असून त्यांनी मिशन आयएएस च्या ग्रीष्मकालीन शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. यावर्षी सिकची रिसॉर्ट येथे होणाऱ्या स्पर्धा परीक्षा संस्कार शिबिरासाठी त्यांना निमंत्रण दिले असून विदर्भात एक आठवडाभर ते विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
त्यांचा बाप समजून घेताना हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात अफाट लोकप्रियता प्राप्त करीत आहेत. मुला मुलींच्या जीवनाला योग्य वळण देणारा हा कार्यक्रम असून अमरावतीला देखील यापूर्वी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जवळ असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भरगच्च उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. त्यांच्या कार्यक्रमाला असलेली प्रचंड उपस्थिती ही सर्वांचे लक्ष वेधून घेते. अतिशय आकर्षक मांडणी व त्याला समर्पक अशा अभिनयाची जोड व आवाजातील चढ उतार यामुळे त्यांचा कार्यक्रम रसिकांचे लक्ष वेधून घेतो. गेल्या 14 वर्षापासून ते डॉ. पंजाबराव देशमुख आयएएस अकादमीशी जुळलेले असून या अकादमीचे संचालक प्रा. डॉ. नरेश चंद्र काठोळे यांना ते आपल्या गुरुस्थानी मानतात. त्यांच्या अमरावती आगमनानिमित्त श्री प्रेम किशोर सिकची चॅरिटेबल ट्रस्ट व डॉ. पंजाबराव देशमुख आयएएसस अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने त्यांच्या सत्काराचे आयोजन वलगाव येथील सिकची रिसॉर्टमध्ये आयोजित केले आहे.
