You are currently viewing सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतुकीवर निर्बंध; वादानंतर पुन्हा सेवा सुरू

सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतुकीवर निर्बंध; वादानंतर पुन्हा सेवा सुरू

सिंधुदुर्ग किल्ला होडी वाहतुकीवर निर्बंध; वादानंतर पुन्हा सेवा सुरू

आ. निलेश राणे यांच्या हस्तक्षेपानंतर तोडगा; पर्यटक व व्यावसायिकांमध्ये समाधान

मालवण
मध्यप्रदेशातील जबलपूर येथे घडलेल्या बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मालवण बंदर विभागाने सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाणाऱ्या प्रवासी होडी वाहतुकीवर प्रवासी क्षमतेसंदर्भात कडक निर्बंध लागू केले. या निर्णयामुळे रविवारी बंदर अधिकारी आणि होडी व्यावसायिक यांच्यात वाद निर्माण झाला असून काही काळ प्रवासी होडी सेवा ठप्प झाली होती.
सुरक्षेच्या कारणास्तव प्रत्येक होडीत मर्यादित प्रवासी घेण्याच्या सूचनेमुळे होडी व्यावसायिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. नियमांचे पालन करूनही अडचणी निर्माण होत असल्याची भूमिका व्यावसायिकांनी मांडली. याबाबत उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनीही पुढाकार घेत आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले.
पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत व्यवसायिकांची बाजू समजून घेत आमदार निलेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सकारात्मक चर्चेनंतर मार्ग काढण्यात आला आणि काही काळ बंद असलेली प्रवासी होडी वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली.
या निर्णयामुळे मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांना दिलासा मिळाला असून पर्यटक व होडी व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच शिवराजेश्वर किल्ला प्रवासी होडी वाहतूक संघटनेतर्फे आमदार निलेश राणे यांचे आभार मानण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा