You are currently viewing पैठणीच्या प्रेमात मी
Oplus_16908288

पैठणीच्या प्रेमात मी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा सौ सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*पैठणीच्या प्रेमात मी…*

 

पैठणीच्या प्रेमात मी पडले, पैठणीच्या प्रेमात मी पडले..

राजसाचे तिथेच कि हो अडले…

 

मला म्हणाला घेऊन देतो

इरकल सुंदरशी

पडणार नाही पैठणीच्या

तुझ्या बघ मी फशी..

फुरंगटून मी बसले मग हो खूपच तडतडले

राजसाचे तिथेच कि हो अडले…

 

मग म्हणाला सुंदरशी ती

घेऊ सोलापुरी

नको नको ते काठ पदर ग

नको मला भरजरी..

तडतडला मग माझ्यावर तो खूपच मग रडले

राजसाचे तिथेच कि हो अडले..

 

अडून बसले पैठणीपाशी

मुळी न मी डगमगले

हरले नाही मुळी पहा मी

शेवटी ते हरले..

काय सांगू मनासारखे त्या दिवशी हो घडले

आणली पैठणी सुंदरशी अन् मन तिच्यावर जडले…

पैठणीच्या प्रेमात मी पडले…

पैठणीच्या प्रेमात मी पडले…

 

प्रा.सौ.सुमती पवार नाशिक

(९७६३६०५६४२)

प्रतिक्रिया व्यक्त करा