*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य ज्येष्ठ कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*
*कामगार दिन*
स्वतः काबाडकष्ट करून
जनतेच्या हितासाठी
संसार पोटापाण्यासाठी
तुटपुंज्या मिळकतीवर
मालकाच्या गडगंज फायद्यासाठी
कामं करून मालकाला
गार करणारं
माणूस नावाचं यंत्र , यंत्रणा
म्हणजेच कामगार. …
त्या कामगाराच्या हितासाठी
कुणीतरी झटलं पाहिजे म्हणून
कामगार संघटनांचा जन्म झाला
त्या संघटनांच्या
मुख्य अधिकार्यांना
हाताशी धरून
त्यांची सरबराई करून
परिणामी त्यांची
मुस्कटदाबी करून
मालकांनी डाखिणीचा
डाव खेळला
आणि,
तुटपुंज्या मिळकतीवरच
कामगार , मजूर
मजबूर होऊन उपेक्षितच राहिला
वर्षभर राबून
एका दिवसाचा सण पाळून
कामगार दिनाला
झेंडा फडकवला
सन्मान तर मिळतच नाही
पण तेवढाच काय तो
मान शान आराम करून
कामगार दिन साजरा झाला
आज १ मे आहे ……
हक्काचा दिवस……
कवी :-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
7588318543.
