You are currently viewing जिल्हास्तरावर युवा पुरस्कारासाठी वैयक्तिक व संस्थांनी  20 मार्च पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

जिल्हास्तरावर युवा पुरस्कारासाठी वैयक्तिक व संस्थांनी  20 मार्च पर्यत अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा स्तरिय युवा पुरस्कार वैयक्तीक व संस्थांकडून विहीत नमुन्यात दि 20 मार्च 2021 रोजी पर्यत अर्ज मागविण्यात येत आहेत.गौरवपत्र,सन्मानचिन्ह व रोख 10 हजार रुपये असे या       पुरस्काराचे  स्वरुप आहे.

        वैयक्तिक पुरस्कासाठीचे निकष पुढील प्रमाणे आहेत. अर्जदाराचे वय पुरस्काराकरिता 18 ते 35 वर्षे असावे. जिल्हा पुरस्काराकरिता अर्ज करणाऱ्या अर्जदाराचे त्या जिल्ह्यात सलग 5 वर्षे व राज्यात 10 वर्षे वास्तव्य असणे आवश्यक आहे. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थांना विभागातून दिले जाणार नाहीत, पुरस्कार मरणोत्तर व्यक्तीस जाहीर करता येणार नाही. पुरस्काराकरिता पात्र व्यक्तीने  केलेल्या कार्याचे सबळ पुरावे कात्रणे,फोटोसह, सादर करणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. अर्जदार व्यक्तीने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान 2 वर्षे क्रियाशिल राहणार असल्याचे हमिपत्र सादर करणे आवश्यक आहे. एका जिल्हात पुरस्कार प्राप्त व्यक्ती इतर कोणत्याही जिल्ह्यात पुरस्काराकरीता पात्र राहणार नाही. केंद्र,राज्य,शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच विद्यापीठ प्राध्यपक, कर्मचारी हे पुरस्काराकरीता पात्र राहणार नाही.

      संस्थांसाठीच्या पुरस्कासाठीचे निकष पुढील प्रमाणे आहेत. पुरस्कार व्यक्ती अथवा संस्थांना विभागागून दिले जाणार नाही. पुरस्काराकरीता पात्र संस्थांनी केलेल्या कार्याचे सबळ पुरावे कात्रणे, फोटोसह, सादर करणे आवश्यक आहे. अर्जदार व्यक्तीचे कार्य हे स्वयंस्फूर्तीने केलेले असावे. अर्जदार संस्थेने पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर किमान 2 वर्षे क्रियाशिल राहणार असल्याचे हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. संस्था सार्वजनिक विश्वस्त अधिनियम 1860 किंवा मुंबई पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार नोंदीकृत असावी. संस्थेने पोलिस विभागाने प्रमाणित केलेले चारित्र दाखला सोबत जोडणे  आवश्यक आहे. एका जिल्ह्यात पुरस्कार पात्र संस्थाना पुन्हा अर्ज करता येणार नाही.

            तरी पात्र व्यक्ती व संस्थानी दिनांक 20 मार्च 2021 पर्यत आपले प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे पाठवावीत अधिक माहितीसाठी 9421643359 संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  विजय शिंदे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा