ठाणे :
भगवतगीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात धर्म अधर्माचा संघर्ष जेव्हा वाढेल तेव्हा मी अधर्माचा विनाश घडवण्याकरता येत राहील, पण ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत सांगितले माणसाची फक्त खल प्रवृत्ती नष्ट होवो. एवढेच मला हवे आहे. याकरता ज्ञानेश्वरानी पसायदान लिहिले. असे विचार लेखक एडवोकेट .रुपेश पवार यांनी व्यक्त केले. ते ठाणे महानगरपालिकेच्या पंडीत दीनदयाल निराधार बेघर केंद्रात आजी= आजोबांशी संवाद साधताना बोलत होते.
यावेळी साहित्यिका सौ. शुभांगी पासेबंद यांनी श्रीज्ञानेश्र्वर माऊली रचित पसायदानावर यथासांग भावार्था सह निरूपण केले. त्या म्हणाल्या, पसायदानातले विचार आज च्या कळातही गरजेचे आहेत. कारण माणसातील चांगुलपणा नष्ट होत चालला आहे. अशा परिस्थितीत समाजाला योग्य दिशादर्शक हे पसायदानच करणार आहे. पुढे त्या म्हणाल्या श्री.ज्ञानेश्वरांसारखे संत आज होणे कठीण आहे. पूर्वी आपण म्हणायचो साधुसंत येती घरा तोच दिवाळी, दसरा आता म्हणावे लागेल साधुसंत येती घरा खिडकी दरवाजे बंद करा. असे म्हणून त्यांनी आजच्या भोंदू संतांची खरी भूमिका स्पष्ट केली. अशाच प्रकारे सध्य काळाची उदाहरणे देऊन शुभांगी ताई यांनी पसायदानावर सुंदर विचार मांडले. रुपेश पवार यांनी पसायदानाचे सादरीकरण केले. त्याआधी रुपेश पवार यांनी ज्ञानेश्वरांचे जीवनदर्शन आपल्या शब्दात मांडले
या कार्यक्रमात समाजसेवक लेखक राजेंद्र गोसावी व श्री.करुणाकरण पै यांनी आजी आजोबांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती. समाजसेविका कुसुम यादव, निवृत्त डेप्युटी डायरेक्टर इंडस्ट्रियल सेफ्टी चंद्रशेखर पासेबंद रुपेश यांचे आजोबा नथुराम जाधव, कवी विवेक डुंबरे या निराधार केंद्राचे मॅनेजर प्रवीण वाघमारे केअरटेकर काजल शिरसाठ मॅडम हे सर्वजण उपस्थित होते. शुक्रवारी महाराष्ट्र दिनाचे (एक मे चे) औचित्य साधून चैतन्य चॅरिटेबल ट्रस्ट आणि नाट्यतुषार यांच्या संयुक्त विद्यमाने हा धान्य दानाचा, ज्ञानदानाचा व स्नेहभोजनचा कार्यक्रम ठाण्यातील ठा.म.पा.संचलीत पंडीत दीनदयाल बेघर निराधार निवारा केन्द्र येथे संपन्न झाला. सौ कुसुम यादव यांनी आपली बहीण कै. स्मिता चव्हाण यांच्या कादंबरीचे वाटप केले. मग त्या आपल्या बहिणीबद्दल भरभरून बोलल्या. हा संपूर्ण कार्यक्रम राजेंद्र गोसावी यांच्या सौजन्याने परिपूर्ण झाला.श्री. गोसावी यांनी रुपेश पवार यांच्या कार्याबद्दल खूप काही सांगितले. हा कार्यक्रम झाल्यामुळे केंद्रातील सर्व आजी आजोबांना आनंद झाला.
नट्यतुषार
