You are currently viewing शिरगांवमध्ये जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन; पारदर्शक कारभाराला गती देण्याचा निर्धार

शिरगांवमध्ये जिल्हा बँकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन; पारदर्शक कारभाराला गती देण्याचा निर्धार

मनीष दळवी यांच्या नेतृत्वाखाली सर्वसामान्यांसाठी बँकेची वाटचाल — मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन

देवगड / (प्रतिनिधी):

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या शिरगांव शाखेच्या स्वमालकीच्या नव्या इमारतीचा स्थलांतर सोहळा उत्साहात पार पडला. या नूतन इमारतीचे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना त्यांनी जिल्ह्यातील तरुण, महिला व व्यावसायिकांनी आर्थिक नियोजन करून मोठी झेप घ्यावी, असे आवाहन केले. “सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही तुमची स्वतःची बँक आहे, ती नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहील. राणे साहेबांच्या स्वप्नातील पारदर्शक बँकिंग व्यवस्थेला पुढे नेण्याचे काम अध्यक्ष मनीष दळवी करत आहेत,” असे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, बँक संचालक प्रकाश बोडस, संदिप साटम, अँड प्रसाद करंदिकर, जि.प. सदस्य देवदत्त कदम, शिरगाव प.स. सदस्य शीतल तावडे, तळवडे प.सं सदस्य सलोनी तळवडेकर, शिरगाव वि. सोसा. चेअरमन विश्राम लोके, साळशी वि. सोसा. चेअरमन सत्यवान सावंत, हडपीड वि.सोसा. चेअरमन रामचंद्र राणे, तोरसोळे वि. सोसा.चेअरमन अरविंद पवार, महाळुंगे नाद वि सोसा.चेअरमन सुरेश राणे, तळेबाजार वि. सोसा. चेअरमन सदानंद देसाई, जिल्हा बँकेचे प्र.मुख्य कार्य अधिकारी दिवाकर देसाई, प्रशासन सरव्यवस्थापक शरद सावंत, झेप सरव्यवस्थापक नितीन सावंत, शिरगांव शाखा व्यवस्थापक बापू शेळके, तालुका विकास अधिकारी संजय घाडी, विकास अधिकारी संजय परब, जिल्हा बँकेचे अधिकारी, कर्मचारी शिरगांवचे ग्रामस्थ, ग्राहक,ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मनीष दळवी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, बँकेची प्रगती करताना सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, विद्यार्थी व व्यापाऱ्यांचा विचार केंद्रस्थानी ठेवला जात आहे. “बँकेने केवळ व्यवसाय वाढवला नाही, तर नफा आणि विश्वासही वाढवला आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात बँक महत्वाची भूमिका बजावत आहे,” असे ते म्हणाले.

या सोहळ्यामुळे शिरगांव परिसरात बँकिंग सेवा अधिक सक्षम व आधुनिक पद्धतीने उपलब्ध होणार असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा