You are currently viewing आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्वानंद महिला तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन संपन्न 

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त स्वानंद महिला तर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन संपन्न 

चिंचवड बिजलीनगर – (दिनांक २१ जून)

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, योग क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शक श्री. संजयजी हिरालालजी ओस्तवाल यांचा “मॅजिशियन ऑफ योग” (योगाचे जादूगार), “आरोग्यं धन-संपदा” आणि “सक्रिय योग मार्गदर्शक” अशा पदव्यांनी सन्मान करण्यात आला.

ध्यान योगी आचार्य शिवमुनीजी महाराज साहेब यांच्या आशीर्वादाने, ‘स्वानंद महिला संस्थे’ने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महिलांच्या आरोग्यासाठी समर्पित एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते; ज्यामध्ये ‘लाफ्टर योग’ (हास्ययोग) आणि ‘योग साधना’ यांचा समावेश होता.

 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि प्रतिष्ठित समाजसेवक श्री. संजयजी हिरालालजी ओस्तवाल यांचा गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम नगरसेविका सौ. आशाताई सूर्यवंशी, मा प्राचार्य श्री. प्रकाशजी कटारिया, लाफ्टर योग प्रशिक्षक सौ. मीना पोकर्णा, स्वानंद महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ. शोभा बंब आणि स्वानंद संस्थापक अध्यक्ष, प्रा सुरेखा कटारिया यांच्या उपस्थितीत पार पडला.

सौ. मीना पोकर्णा यांनी लाफ्टर योगाच्या माध्यमातून महिलांचा उत्साह वाढवला.याप्रसंगी महिलांना ध्यान योग आणि लाफ्टर योगाचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच, योगासनांची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली आणि महिलांच्या आरोग्यासाठी योगाचे महत्त्व या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.

चर्चासत्राचे संचालन कीर्तनकार डॉ. श्वेता राठोड यांनी केले, तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेश्मा भंडारी यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन सौ. शोभा बंब, सौ. शकुंतला दुगड, सौ. प्रतिभा ओस्तवाल, सौ. सविता बांठिया, सौ. मनीषा चोरडिया आणि सौ. उषा बोथरा यांनी केले होते.

चर्चासत्रादरम्यान, श्री. संजयजी ओस्तवाल यांनी रजोनिवृत्तीच्या (मेनोपॉज) काळात होणाऱ्या हार्मोनल बदलांचे व्यवस्थापन करण्यासाठी योग आणि ध्यानाचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. महिलांनी या सत्रात सक्रिय सहभाग नोंदवला आणि आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा