नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन; नव्या मंडळामुळे १९०२ किमी रस्ते व ६७७ इमारतींचे व्यवस्थापन सुलभ
सिंधुदुर्गनगरी :
जिल्हाधिकारी कार्यालयातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्षक अभियंता यांच्या नुतन कार्यालयाचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी आमदार निलेश राणे, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, कार्यकारी अभियंता पुजा इंगवले तसेच सिंधुदुर्ग बँक अध्यक्ष मनीष दळवी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
२४ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग (कोकण) अंतर्गत सिंधुदुर्ग येथे नवीन मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाअंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली, सावंतवाडी आणि पत्तन हे तीन विभाग समाविष्ट असून एकूण २४ पदांना मंजुरी देण्यात आली आहे.
या मंडळाच्या अखत्यारित तब्बल १,९०२ किलोमीटर लांबीचे रस्ते तसेच ६७७ इमारतींचे व्यवस्थापन केले जाणार आहे. नव्या कार्यालयामुळे कामकाज अधिक सुसूत्र, गतिमान आणि कार्यक्षम होऊन जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
