*सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांचा भव्य सत्कार*
*विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडे सिंधुदुर्ग वासियांची मोठी अपेक्षा- वैभव नाईक*
सिंधुदुर्ग
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पद स्वीकारल्यानंतर आज प्रथमच वैभव नाईक यांनी सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख माजी आमदार वैभव नाईक यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला. शिवसेना जिंदाबाद! बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो! वैभव नाईक तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है! अशी घोषणाबाजी याप्रसंगी करण्यात आली. यावेळी वैभव नाईक यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत जिल्ह्यातील विविध विषयांवर चर्चा केली.
जिल्हाप्रमुख वैभव नाईक म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा आपल्याला शिवसेना संघटना उभी करायची आहे. काही लोक नेहमी सत्तेसोबत असतात, सत्तेसाठी वेगवेगळे पक्ष बदलतात आणि स्वतःचा स्वार्थ साधतात. मागील दोन वर्षात जिल्ह्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामध्ये सावंतवाडी हॉस्पिटल,बाळासाहेब ठाकरे दवाखाना बंद आहे. हत्ती व इतर वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे, नागरिकांचे नुकसान होत आहे.आंबा काजू नुकसानीचे अजून पंचनामे झालेले नाहीत. अदानीच्या स्मार्ट मीटरचे बिल भरमसाठ येत आहे. परप्रातीयांकडून स्थानिकांना होणारा त्रास या सर्व प्रश्नांवर आवाज उठविण्याची जबाबदारी विरोधी पक्ष म्हणून आपल्यावर असून त्यासाठी सिंधुदुर्ग वासियांची मोठी अपेक्षा आहे.त्याचबरॊबर विभागावर दौरे करून सर्वांना विश्वासात घेऊनच संघटनेचे काम केले जाईल. जुन्या कार्यकर्त्यांना एकत्र आणण्यासाठी व प्रवाहा बाहेर गेलेल्यांना एकत्र करून संघटना वाढविली जाईल. शिवसेना संघटना वाढीसाठी आपण सर्वानी मेहनत घेऊया. नवीन पदाधिकाऱ्यांना संधी देऊया असे वैभव नाईक यांनी सांगितले.
सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ म्हणाले, वैभव नाईक यांनी याआधीही जिल्हाप्रमुख म्हणून चांगले काम केले आहे. म्हणून पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी काम करून शिवसेना संघटना बळकट करूया असे त्यांनी सांगितले.
बाळा गावडे म्हणाले,पुन्हा संघटना उभी करण्याची आणि लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरण्याची धमक वैभव नाईक यांच्यामध्ये आहे. अशा नेतृत्वाला आपण साथ देऊन उद्धवजींना अपेक्षित संघटना वाढीचे काम करूया असे सांगितले.
उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, महिला नेत्या सीमा मठकर, तालुकाप्रमुख राजू शेटकर,निशिकांत तोरसकर,रमेश गावकर, यांनी मार्गदर्शन करताना वैभव नाईक हे धडाडीचे नेतृत्व असून त्यांच्या नेतृत्वाखाली ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या ब्रीद वाक्याप्रमाणे सर्वांनी काम करण्याचे आवाहन तकेले.
याप्रसंगी उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार,माजी जिल्हाप्रमुख रमेश गावकर,शहर प्रमुख शैलेश गौंडळकर, तालुका संघटक निशांत तोरसकर, महिला तालुका संघटक नम्रता झारापकर, अपर्णा कोठावळे, भारती कासार, श्रुतिका दळवी,रमेश सावंत, फिलीप्स रॉडिक्स, साई काणेकर, आबा केरकर, विनोद काजरेकर,प्रशांत बुगडे, निशिकांत तोरसकर, आशिष सुभेदार, प्रमोद सावंत, समीरा खलील, उदय अळवणी, गोकुळदास मोटे, श्री.वाडकर आदींसह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
