कोल्हापूर / प्रतिनिधी :
गांधीनगर (ता.करवीर) येथे संत निरंकारी मिशन यांच्यातर्फे बाबा गुरुबचन सिंहजी यांचा स्मृती दिन अर्थात २४ एप्रिल मानव एकता दिनानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.या शिबिरात ५२६ रक्तदात्यांनी रक्तदान करुन सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
यावेळी सीपीआर रुग्णालय आणि शाहू ब्लड बँक यांच्या पथकाने अत्यंत सेवाभावी वृत्तीने रक्तदानाची यंत्रणा राबवली.
यावेळी संत निरंकारी मिशनचे सचिव जोगिंदर सुखीजा यांनी संत निरंकारी मिशनच्या वतीने देशभरात एकाच वेळी सुमारे २०० ठिकाणी रक्तदान शिबिर होऊन सुमारे ४० हजार युनिट रक्त संकलित झाल्याचे सांगितले.तसेच वर्षभर चालणाऱ्या या सामाजिक उपक्रमात सुमारे ७०५ ठिकाणी रक्तदान शिबीर होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी अमरलाल निरंकारी, डॉ.सदानंद भिसे, अविनाश रास्ते, शशि गजवानी यांच्यासह विविध मान्यवर, वैद्यकीय पथक, रक्तदाते व संत निरंकारी मिशनचे भाविक उपस्थित होते.
