You are currently viewing मणेरी येथील अपघातात दुचाकीस्वार गंभीर

मणेरी येथील अपघातात दुचाकीस्वार गंभीर

जखमी युवक जीवन प्राधिकरणचा अभियंता

दोडामार्ग

दोडामार्ग येथील आपले काम आटपून आपल्या घरी जात असताना मणेरी या ठिकाणी कुत्रा आडवा आल्यामुळे दुचाकीची जोरदार धडक बसून जीवन प्राधिकरण चा अभियंता गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की, सदर संजय सकपाळ (वय साधारण ३५) हा अभियंता आपले दोडामार्ग येथील काम आटपून आपल्या ताब्यातील दुचाकी(एम एच १४एच एफ ४७२८) घेऊन जात असता त्याची धडक मणेरी (कुमायाकडे) याठिकाणी आली असता कुत्र्याला बसली. ही धडक एवढी जबरदस्त होती की कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला यात हा अभियंता गंभीर जखमी असून त्याला दोडामार्ग येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गोव्यात पाठवण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =