You are currently viewing आंबोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना

आंबोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना

आंबोली येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची स्थापना…

आंबोली

येथील राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून कामतवाडी परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. हा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. विशेष म्हणजे रायगडावर स्थापन करण्यात आलेल्या मूर्तीची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली आहे. उद्या या ठिकाणी शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे

यावेळी माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, राजे प्रतिष्ठान अध्यक्ष उल्हास गावडे, प्रमुख गावकर श्रीकांत गावडे, शशीकांत गावडे, वसंत गावडे, प्रकाश(बाळा)गावडे, साबा गावडे, केंद्रप्रमुख रामा गावडे, बबन गावडे, काशीराम गावडे, ग्रामपंचायत सदस्य शंकर चव्हाण, तानाजी गावडे, राजे प्रतिष्ठानचे सर्व सदस्य, महिला, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा