You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी जयंती साजरी

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने राजीव गांधी जयंती साजरी

सावंतवाडी

भारताचे माजी पंतप्रधान कै. राजीव गांधी यांची जयंती सिंधूदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांच्या संपर्क संपर्क कार्यालयात साजरी करण्यात आली.
यावेळी माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अड. दिलीप नार्वेकर, जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी, जिल्हा सरचिटणीस राजू मसुरकर, तालुकाध्यक्ष महिंद्र सांगोलकर, शहराध्यक्ष अड. राघवेंद्र नार्वेकर, सौ. विभावरी सुखी, आनंद परुळेकर, सच्चिदानंद बुगडे, फर्नांडिस आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा