You are currently viewing रणझुंजार वैभववाडी संघ आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता

रणझुंजार वैभववाडी संघ आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता

तर रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ ठरला उपविजेता

आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते विजेत्या,उपविजेत्या संघांना पारितोषिकांचे वितरण

देवगड नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

देवगड येथील आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना रणझुंजार वैभववाडी विरुद्ध रोहित स्पोर्ट वेंगुर्ले या दोन संघात झाला.प्रथम फलंदाजी केलेल्या रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघाने 6 षटकात 56 धावांचे आव्हान ठेवले होते. अटीतटीच्या झालेल्या सामन्यात रणझुंजार वैभववाडी संघाने 56 धावांचे आव्हान पार करत आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपले नाव कोरले.तर रोहित स्पोर्ट वेंगुर्ले संघ उपविजेता ठरला. शनिवारी रात्री झालेल्या सेमिफायनल व फायनल सामन्यांसाठी कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.आ.वैभव नाईक यांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या दोन्ही संघांना पारितोषिक व चषक देऊन गौरविण्यात आले.
यावेळी देवगडचे नगरसेवक निवृत्ती उर्फ बुवा तारी, शिवसेना देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, जयेश नर, नगराध्यक्षा साक्षी प्रभू,संतोष तारी,विशाल मांजरेकर, श्री.खेडेकर,हर्षा ठाकूर, कुडाळ उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, अनुप नाईक,गौरव सावंत,सहदेव बापार्डेकर,गणेश गावकर, नितीन राऊळ,रिमेश चव्हाण,अरुण परब आदिंसह आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेचे आयोजक, मंडळाचे कार्यकर्ते व मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + 4 =