You are currently viewing सामंत ट्रस्ट तर्फे गरजू लाभार्थ्यांना

सामंत ट्रस्ट तर्फे गरजू लाभार्थ्यांना

*धनादेश प्रदान करताना डॉ. जयेंद्र परूळेकर*

 

सावंतवाडी :

आज सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.

बांदा येथील अंजली सावंत या बीएससी केमिस्ट्री या विषयात ९२ टक्के मिळवून उत्तीर्ण झालेल्या होतकरू आणि बुद्धीमान विद्यार्थ्यिनीला एमएससी या उच्च शिक्षणासाठी, निगुडे येथील डावा हात निकामी होऊन अपंगत्व आलेले राजन निगुडकर, भटवाडी सावंतवाडी येथे राहणाऱ्या आणि निराधार असलेल्या अर्चना वाडेकर, आकडीच्या आजाराने त्रस्त तुळसूली माणगाव येथील कृष्णा जाधव वय वर्ष सहा आणि बांदा येथील ह्रदयरोग रुग्ण पार्श्वनाथ सावंत मोर्ये अशा पाच लाभार्थी व्यक्तींना डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. या ट्रस्टमार्फत दरवर्षी सहा लाख रुपये गरजू लाभार्थ्यांना डॉ. परुळेकर यांच्या माध्यमातून देण्यात येतात. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व डॉक्टरोपचार घेतले असलेल्या गोरगरीब रुग्णांना सोयीस्कर ठरते त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाची जिल्ह्यामध्ये नेहमीच स्तुती होत असते. या कार्यक्रमाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत आणि सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी या संस्थेचे रवी जाधव व शेखर सुभेदार हे यावेळी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा