You are currently viewing सावंतवाडीच्या “नॅब” हॉस्पिटलमध्ये आता डोळ्यावर होणार शस्त्रक्रिया – अनंत उचगावकर

सावंतवाडीच्या “नॅब” हॉस्पिटलमध्ये आता डोळ्यावर होणार शस्त्रक्रिया – अनंत उचगावकर

सावंतवाडी

येथील “नॅब” हॉस्पिटलमध्ये ११ डिसेंबर पासून डोळ्यांना “फेको लेन्स” बसवण्याची शस्त्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेले अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आता तज्ञ डॉक्टर आणि टिमच्या उपस्थितीत सुरू करण्यात येत आहे.

या ठिकाणी डोळ्यांची शस्त्रक्रिया त्याच बरोबर चष्मा, गाॅगल लेन्स आदी सुविधा कमी खर्चात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. “नॅब” संस्थेच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी म्हणून हे उपक्रम राबविले जाणार आहेत. त्यामुळे या सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा