You are currently viewing म्युझिक कॉर्नरच्या लकी ड्रॉ ऑफरमध्ये संतोष पास्ते हे ठरले प्रथम पारितोषिक टू व्हीलरचे मानकरी

म्युझिक कॉर्नरच्या लकी ड्रॉ ऑफरमध्ये संतोष पास्ते हे ठरले प्रथम पारितोषिक टू व्हीलरचे मानकरी

म्युझिक कॉर्नरच्या लकी ड्रॉ ऑफरमध्ये संतोष पास्ते हे ठरले प्रथम पारितोषिक टू व्हीलरचे मानकरी

द्वितीय विजेते राजेंद्र लेंगडें;  तर तिसर्‍या बक्षिसाचे मानकरी ठरले शिक्षण मंत्री दीपक केसरकर..

सावंतवाडी

सावंतवाडीतील सुप्रसिद्ध ‘म्युझिक कॉर्नर’च्या माध्यमातून दसरा, दिवाळी निमित्त डबल ट्रिपल धमाका ऑफर ठेवण्यात आली होती. फायनान्स आणि रोख खरेदी 5990/- रुपयांच्या पुढे कोणत्याही वस्तुवर एक लकी ड्रॉ कुपन देण्यात आलं होतं. हे लकी ड्रॉ कार्तिकी एकादशी निमित्त चिमुकल्यांच्या हस्ते काढण्यात आले.

म्युझिक कॉर्नरच्या या लकी ड्रॉ ऑफरमध्ये पहिल्या TVS Zest टू व्हीलरचे संतोष पास्ते हे मानकरी ठरले आहेत. द्वितीय क्रमांकांच्या मोबाईलसाठी राजेंद्र लेंगडे हे लकी विजेते ठरले आहेत. तर तृतीय क्रमांकाच्या 32 इंची Smart LED टिव्हीचे लकी विजेते शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर ठरले आहेत. विठ्ठल मंदिर रोड, जय प्रकाश चौक सावंतवाडी येथील शोअरूमध्ये हा लकी ड्रॉ काढण्यात आला. सिया मारगी, आर्या पाटील, संदीप प्रजापती, रिशब हावळ या चिमुकल्यांच्या हस्ते हे लकी ड्रॉ काढण्यात आले.

म्युझिक कॉर्नरचे राजन हावळ यांनी या ऑफरला ग्राहकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल आभार मानत तिनही लकी ड्रॉ विजेत्यांचे अभिनंदन केलं आहे.

यावेळी म्युझिक कॉर्नरचे राजन हावळ, रितेश हावळ, रमेश हावळ, रितिका हावळ, बजाज फायनान्सचे प्रमुख संदिप कराळे, सय्यद रसूल, प्रविण पाटील, अमर माने, आयनेटचे सुबोध शेलटकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा