You are currently viewing शिवराज मराठा हायस्कूल साळगावची दुर्वा धुरी जिल्ह्यात प्रथम..!

शिवराज मराठा हायस्कूल साळगावची दुर्वा धुरी जिल्ह्यात प्रथम..!

शिवराज मराठा हायस्कूल साळगावची दुर्वा धुरी जिल्ह्यात प्रथम..!

📍 कुडाळ | २२ एप्रिल

शिक्षण प्रसारक मंडळ, झाराप पंचक्रोशी साळगाव संचलित शिवराज मराठा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, साळगाव येथील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या कु. दुर्वा निलेश धुरी हिने NMMS परीक्षेत १८० पैकी १५० गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

तिच्या या उज्ज्वल यशासोबतच विद्यालयातील अस्मि सदानंद घाडी, श्रावणी संभाजी कक्केरकर व दिया गोविंद हरमलकर या विद्यार्थिनींनी देखील परीक्षेत यश मिळवले आहे.

या सर्व विद्यार्थिनींच्या यशामागे शिक्षकवृंद, विषय शिक्षिका चव्हाण मॅडम,पिळणकर सर,धुरी सर तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सलीम तकीलदार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.

या अभिमानास्पद यशाबद्दल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री. मुकुंद धुरी, संस्था सचिव मा. श्री. प्रदीप प्रभूतेंडोलकर तसेच संस्था पदाधिकारी,मुख्याध्यापक श्री. सलीम तकीलदार यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

🌟 विद्यार्थिनींच्या उज्ज्वल भविष्यास हार्दिक शुभेच्छा!
🚩 जय हिंद! 🚩

प्रतिक्रिया व्यक्त करा