You are currently viewing टेनिसपटू लिंयान्डर पेस आणि अभिनेत्री झरीना खान यांच्या उपस्थितीत  पत्रकार सागर चव्हाण यांना  प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड बहाल

टेनिसपटू लिंयान्डर पेस आणि अभिनेत्री झरीना खान यांच्या उपस्थितीत पत्रकार सागर चव्हाण यांना प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड बहाल

 गोवा येथील पंचतारांकित मेरियट रिसॉर्ट इथं दिमाखात पार पडला सोहळा

पणजी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार सागर चव्हाण यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड २०२० टेनिसपटू लिंयान्डर पेस आणि बॉलिवूड अभिनेत्री झरीना खान यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच बहाल करण्यात आला.

नेल्सन मंडेला नोबेल प्राईज अवार्ड अकॅडमीच्यावतीने गोवा येथील पंचतारांकित मेरीयट रिसॉर्ट इथं मोठ्या दिमाखात हा सोहळा नुकताच पार पडला. समाजात निरपेक्ष हेतून कार्य करणाऱ्यांचा या अवार्डनं सन्मान करण्यात आला.

यामध्ये पद्मश्री, पद्मभूषण, कोरोना वॉरियर्स आदीसह सामाजिक कार्यकर्त्यांचा नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड देऊन सन्मान करण्यात आला. त्याच बरोबर द अमेरिकन युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीसचा नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड आणि डॉक्टरेट ही पदवी त्यांना बहाल करण्यात आली.

नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्ड अॅकडमीचे चेअरमन डॉ. राजकुमार टाक यांनी मान्यवरांच स्वागत केलं. टेनिसपटू लिंयान्डर पेस, इंडिया सिनेमा डायरेक्टर श्रीकुमार मेनन, बॉलिवूड अभिनेत्री झरीना खान, इंडियन रेसलर संग्राम सिंग, टायगर गृपचे अध्यक्ष तानाजी भाऊ जाधव, श्याम नरेन फाउंडेशन चेअरमन कैलाश बिहारी सिंग आदींना डॉक्टरेट पदवीने यावेळी सन्मानित करण्यात आलं. तर पत्रकारितेत नवनवीन प्रयोग करुन त्यातून समाजप्रबोधनाच काम केल्याबद्दल पत्रकार सागर चव्हाण यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या नेल्सन मंडेला नोबेल पीस अवार्डनं सन्मानित करण्यात आल.

यावेळी संस्थापक अध्यक्ष डॉ.राजकुमार टाक, सचिव डॉ. जोशुवा इमानूएल, उपाध्यक्ष डॉ. विजसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 1 =