You are currently viewing वसुबारस निमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळा वेंगसर येथे देशी गायीचे महत्त्व पटवून दिले

वसुबारस निमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळा वेंगसर येथे देशी गायीचे महत्त्व पटवून दिले

वसुबारस निमित्त जिल्हा परिषद केंद्र शाळा वेंगसर येथे देशी गायीचे महत्त्व पटवून दिले

गव्यसिद्ध श्री. महेश संसारे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; नैसर्गिक शेती, पंचगव्य आणि पर्यावरण संवर्धनावर विशेष भर

वेंगसर :

वसुबारस सणाचे औचित्य साधून जिल्हा परिषद केंद्र शाळा वेंगसर येथे गव्यसिद्ध श्री. महेश संसारे यांनी विद्यार्थ्यांना देशी गायीचे धार्मिक, वैज्ञानिक, कृषी आणि पर्यावरणीय महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
यावेळी वसुबारसच्या दिवशी गायीचे पूजन का केले जाते, भारतीय संस्कृतीमध्ये गायीला गोमातेचा दर्जा का दिला आहे, याची माहिती त्यांनी दिली. देशी गाय ही केवळ दूध देणारा पशू नसून भारतीय कृषिसंस्कृतीचा महत्त्वाचा आधार असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा