You are currently viewing सुरण पुराण

सुरण पुराण

*ज्येष्ठ लेखिका कवयित्री कला शिक्षिका स्वप्नगंधा सतीश आंबेतकर लिखित अप्रतिम लेख*

 

*सुरण पुराण*

 

नाव ऐकून आश्चर्य चकित झाला असाल ना!

हा काय प्रकार आहे? गोंधळातच पडले असाल सारे?त्याचे काय झाले आज सकाळी च जावयानी त्यांच्या बागेतल्या सुरणाच्या फुलाचा फोटो पाठवला. लगेच मी हातातले काम टाकून फोटो पाहिला, डोक्यात चक्रे

सुरु झाली.

आमच्या वाड्यात परसात मोकळ्या जागेत बरीच झाडे येत असत, उगवत असत, काही लावलेली, निगराणी केलेली तर काही उगाच उनाडपणे इथे तिथे विखुरलेली.तर अशीच वाड्यात बर्यापैकी कितीतरी औषधी आणि उपयोगी झाडे येत असत. मला निसर्गाची आवड असल्याने मी रोजच वाड्यात फेरफटका मारताना झाडांचे

निरिक्षण करीत असे. कोणते बहरले आहे, कोणाला कळ्या आल्यात, कुठे पालवी फुटली आहे, कुठे पाने सुकली आहेत, कुठे फुले, फळे बहरली आहेत, रोज असा आवडीचा छन्द असायचा. तर काय सांगत होते

आठवणीतून एकदम बालपणात गेले. माझ्या आत्याला ही झाडांची आवड होती, तिने मला बरीच माहिती दिली होती, मी पण अगदी मन लावून झाडांची माहिती गोळा करायचे. तशी वाड्यात वेगवेगळी झाडे होती, त्यात सुरणाची झाडेही असायची.

. .. कधी कधी झाडांची छत्रीसारखी पसरलेली सुंदर नक्षीदार पाने मला खूप आवडायची. झाड सुकत आले की, खाली मोठ्ठया बसक्या माठासारखा सुरणाचा मोठा कधी कंद निघायचा. आम्ही कुदळ, पावडे, कोयती, पहार, फावडा, खुरपे अशी अवजारे पडवीत ठेवलेली असायची ती घेऊन तो सुरणसोहळा पार पाडायचो, दोन तीन, चार, पाच सुरण तरी वाड्यात मिळायचे.

ते खोदून काढून आणायचे, विहिरीवर त्याला भरपूर पाण्यात सचैल स्नान घालून स्वच्छ करायचे, तसा वेळ बराच जायचा. मी, आत्या, बहिण, भाऊ एखाद्या शिकारीवर निघाल्यासारखे सारे अवसान एकत्र करुन तो कार्यक्रम पार पाडीत असू.

तुम्ही म्हणाल वेळ कसा मिळत होता? सोप्पे आहे, यांत्रिक करमणुकी नव्हत्या, त्यामुळे स्वकष्टाचे (खाजरे)फळ पण औषधी आणि उपयोगी अशी भाजी आम्हाला मिळायची.

. सुरण मला तसा खूप आवडायचा पण त्याने अंगाला भरपूर खाज

सुटायची, मला त्याची ॲलर्जी आहे, त्यामुळे आताही मला त्रास होतोय, म्हणजे कथा लिहितानाही. त्यावेळी मी एका वाटीत चिंच घेऊन ती बराच वेळ हातापायाला लावून ती खाज कमी करायची. सुरणाचे सर्व खाद्य पदार्थ मला आवडायचे. आजी, आत्या, आई, आजोबा या सर्वाना

अशा भाज्या, कंदमुळे वगैरे अनेक गोष्टींची आयुर्वेदिक माहितीही होती.

आणि आमची आई सुगरण होती, पाकशास्त्रनिपुण, तिच्या माहेरचा वारसा, तर ती अनेक प्रकारात त्या

सुरणाचे पदार्थ बनवायची. ते सर्व सुरण संपेपर्यंत अधून मधून निरनिराळे पदार्थ ती करायची.

 

. तर काय उपवासाच्या दिवशी

हो, पण सुरणाला खूप खाज येते, तोबाहेरुन साले काढून साफ करुन

चांगला उकडून त्याची खाज घालवायला लागत असे.

तर मग तो वाफवून त्याच्या गराची

खीर, लापशी,

पुरण साखर, तूप घालून अन त्याची

 

. ” सुरणपोळी”

 

गोड छान लागायची पुरणपोळीसारखे सुरणाचे पुरण भरुन,

सुरणाच्या वड्या, शेन्गदाणा कूट घालून

 

सगळी रेसिपी लिहित नाही.

तळलेले काप,

वाफवलेले काप, फोडी

सुरणफोडीची साधी भाजी,

सुरणाची मटनासारखी सुकी भाजी,

सुकी मच्छी घालून केलेले दाटसर

लिपते कालवण,

किंवा रस्साभाजी,

सुरणाचे थालीपीठ,

 

वेग वेगळे मसाले वापरुन नवीनतम प्रयोग करुन आई खूप च सुंदर भाज्या बनवायची.आई अन्नपूर्णा च होती तिच्या हातचा प्रत्येक पदार्थ

म्हणजे अन्नपूर्णेचा प्रसादच असायचा.

 

सुरणाच्या वाफवून, त्यात तान्दूळ, नाचणी पीठ घालून केलेल्या फेण्या, पापड सुद्धा छान लागायचे.

 

आता प्रत्येक रेसिपी मी इथे लिहित नाही. पण जर मनात आले तर आपण कितीतरी छान पदार्थ घरी बनवू शकतो. आईकडून तर आम्ही इतके काही शिकलोत, त्या काळात जर मोबाईल, किंवा काही इतकी प्रसारमाध्यमे असती तर आईचे आज कितीतरी युट्युब चॅनेल असते, आणि

तिला किती लाईक मिळाले असते.

 

 

. हो आणि सुरणात पौष्टिक आणि पूर्ण आहारतत्वे आहेत. त्याचे अनेक औषधी उपयोगही आहेत.

पण खाज घालविण्यासाठी आधी

त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते.

 

यामध्ये असलेल्या फायबर,पोटॅशियम,मॅग्नेशियम

अ, ब, क, जीवनसत्वाचा उत्कृष्ट स्रोत यामुळे क्षुधाशमन होतेच, पण वजन कमी, व मधुमेह नियंत्रण, कॅलरी कमी यामुळे शरीरास उपयुक्त.

 

असो, थोडक्यात संपवते, पण आज अचानक कथेसाठी हा विषय मिळेल

असे वाटले नव्हते, आज लिहायला वेळही नव्हता. पण त्यनिमित्ताने लिहिणे झाले.

 

. बिचार्या खाजर्या सुरणालाही कधी

वाटले नसेल की, आपल्या वर कोण इतके मेहेरबान असेल, पण एकेकाची वेळ असते, एकेकाचे वैशिष्ट्य असते.

 

. सुरण जरी खाजरा असला तरी मी मात्र गोड मनाने लिहिले आहे.

 

🙏

स्वप्नगंधा सतीश आंबेतकर

कलाशिक्षिका.

प्रतिक्रिया व्यक्त करा