You are currently viewing महासंस्कृती महोत्सवात चिखली येथिल शाहीर मनोहर पवार यांचा सहभाग

महासंस्कृती महोत्सवात चिखली येथिल शाहीर मनोहर पवार यांचा सहभाग

बुलढाणा :

महासंस्कृती महोत्सवाच्या जागर लोककलेचा कार्यक्रमात पारंपारिक भारुड ‘गोंधळ पोवाडा ‘वासुदेव या लोककला सादर करण्यात आल्या. त्यात चिखली येथील शाहीर मनोहर पवार यांनी सुद्धा सहभाग नोंदविला. सातगाव म्हसला येथील शाहीर प्रमोद दांडगे आणि त्यांचे सहकारी यांचा लोककलेचा व समाज प्रबोधनाचा कार्यक्रम या ठिकाणी सादर करण्यात आला. त्या संचामध्ये शाहीर मनोहर पवार व गायक निवृत्ती जाधव यांनी सुद्धा सहभाग घेतला होता. या संचाद्वारे पारंपारिक गोंधळ सादर करण्यात आले. यावेळी आमदार सौ.श्वेता महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, उपजिल्हाधिकारी शरद पाटील आदी उपस्थित होते.

सांस्कृतिक परंपराचे आदान प्रदान व्हावे या साठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र आणि जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने या महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्ह्यातील अनेक लोककलावंतांनी ‘शाहिरांनी त्यामध्ये आपल्या लोककला सादर केल्या. शाहीर मनोहर पवार केळवदकर यांनी वेगवेगळ्या सांस्कृतिक महोत्सव मध्ये यापूर्वी आपल्या शाहीरी च्यामाध्यमातून विविध प्रबोधनात्मक बेटी बचाव ‘वृक्षारोपण स्वच्छता अभियान’ भ्रूणहत्या ‘जलसाक्षरता’ अभियान शेतकऱ्यांना समुपदेशन तसेच शासकीय विविध योजनांचा प्रसार व प्रचार केला असून शाहीर मनोहर पवार हे मानधन प्राप्त शाहीर ‘लेखक’ कवी व अभिनेते आहेत. तसेच त्यांना विशेष सन्मान ‘जिल्हा गौरव सन्मान’ तसेच ‘शाहीर भूषण पुरस्कार’ आदी विविध पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × one =