You are currently viewing मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी घडवलं सामाजिक बांधिलकीचं दर्शन…..

मत्स्यव्यवसायमंत्री अस्लम शेख यांनी घडवलं सामाजिक बांधिलकीचं दर्शन…..

नौका बुडालेल्या मच्छीमार महिलेस केली आर्थिक मदत.

मुंबई

मढ – कोळीवाडा येथे राहणाऱ्या श्रीमती धाकळू वासुदेव कोळी यांची मासेमारी नौका बुडाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले होते. पतीच्या निधनानंतर मासेमारी नौका हेच श्रीमती धाकळू कोळी व त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन होते. महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग,मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहराचे पालकमंत्री मा.ना.श्री. अस्लम शेख यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी काॅंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना श्रीमती कोळी यांच्या घरी विचारपुस करण्यासाठी पाठविले.

रविवारी स्वत: मत्स्यव्यवसायमंत्री ना. अस्लम शेख यांनी महिलेच्या घरी भेट देऊन रु. ५१००० ची आर्थिक मदत केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक विरेंद्र चौधरी, डाॅ. नेक्सन नाटके व काॅंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − fifteen =