You are currently viewing भाजपचा किल्ले सिंधुदुर्गवर जय भवानी…जय शिवाजीचा जयघोष

भाजपचा किल्ले सिंधुदुर्गवर जय भवानी…जय शिवाजीचा जयघोष

मालवणात भव्य मोटरसायकल रॅली; ढोल ताशाचा गजरात किल्ले सिंधुदुर्गवर शिवजयंती सोहळा उत्साहात साजरा..

मालवण :

 

जय भवानी…जय शिवाजीचा जयघोष, मालवण बाजारपेठेतून काढण्यात आलेली भव्य मोटरसायकल रॅली, ढोल ताशाचा गजरात किल्ले सिंधुदुर्गवर भाजपाने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. भाजप प्रदेश सचिव निलेश राणे यांच्या हस्ते शिवराजेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली. आगामी विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आमदार होऊ दे असे साकडे यावेळी घालण्यात आले.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथे शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला. या निमित्त कुंभारमाठ येथील शिवाजी पुतळा येथून मालवण बाजारपेठेतून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. भगवे झेंडे घेऊन काढलेल्या रॅलीमुळे शहर भगवेमय झाले होते. त्यानंतर शिवराजेश्वर मंदिरात निलेश राणे यांच्या हस्ते महाराजांचे पूजन करण्यात आले. यावेळी निलेश राणे महाराजांसमोर नतमस्तक झाले. यावेळी भाजप पदाधिकारी व शिवप्रेमी यांच्या घोषणांनी तसेच ढोल ताशा पथकाच्या गजराने व फटाक्यांच्या आतिषबाजीने परिसर दुमदुमून गेला.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजन गावकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, अशोक तोडणकर, गणेश कुशे, मंदार लुडबे, ललित चव्हाण, सौरभ ताम्हणकर, अजिंक्य पाताडे, राजू परुळेकर, आनंद शिरवलकर, आप्पा लुडबे, प्रकाश मेस्त्री, भाई मांजरेकर, अभय कदम, राजू बिड्ये, पूजा करलकर, पूजा सरकारे, ममता वराडकर, अन्वेशा आचरेकर, निषय पालेकर, राकेश सावंत, गौरव लुडबे, यासह भाजप पदाधिकारी व शिवप्रेमी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 17 =