You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या कुडाळ महिला बाल रुग्णालयात दर्जेदार सुविधा

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या कुडाळ महिला बाल रुग्णालयात दर्जेदार सुविधा

जिल्ह्यातील पहिले मॉड्युलर प्रसूती गृह रुग्ण सेवेत दाखल*

*आ. वैभव नाईक यांनी केली पाहणी; महिला रुग्णांनी व्यक्त केले समाधान*

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पाठपुरावा करून कुडाळ येथील महिला बाल रुग्णालयाचे काम पूर्ण करून हे रुग्णालय रुग्णसेवेसाठी सुरु केले होते. रुग्णालयाच्या माध्यमातून महिला व बाल रुग्णांना चांगली सेवा दिली जात आहे. या महिला बाल रुग्णालयात जिल्ह्यातील पहिले मॉड्युलर प्रसूती गृह उभारण्यात आले आहे. याची पाहणी आज आमदार वैभव नाईक यांनी केली. जिल्ह्यात कुठेही नसलेली ही सुविधा पूर्ण झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.यावेळी नवजात शिशु कक्ष,रक्ततपासणी प्रयोगशाळा यांची देखील त्यांनी पाहणी केली.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्री. वालावलकर यांच्याशी आ. वैभव नाईक यांनी चर्चा केली.अन्य आवश्यक सुविधांची माहिती घेतली. रुग्णांना येत असलेल्या समस्या व सुविधांविषयी देखील महिला रुग्णांशी आ.वैभव नाईक यांनी संवाद साधला.महिला रुग्णांनी देखील सोयी सुविधांबद्दल समाधान व्यक्त केले.


रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्री. वालावलकर हे याठिकाणी चांगल्या प्रकारे सुविधा देत असून दरमहिन्याला सुमारे १५० महिलांच्या प्रसूत्या याठिकाणी होत आहेत. अवघ्या सहा महिन्यात या रुग्णालयाने हा उच्चांक गाठला आहे. याचे सर्व श्रेय डॉ. वालावलकर यांचे आहे. असे आ.वैभव नाईक यांनी सांगत महिला बाल रुग्णालयात डायलेसिस सेंटर तसेच अजूनही काही दर्जेदार सुविधा सुरु करण्यासाठी कार्यवाही केली जाईल असे आश्वासन दिले.
याप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्री वालावलकर, शिवसेना तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, माणगाव उपसरपंच बापू बागवे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा