You are currently viewing बांदा केंद्र शाळेची स्वामिनी तर्पे ठरली महाराष्ट्राची बालकवी

बांदा केंद्र शाळेची स्वामिनी तर्पे ठरली महाराष्ट्राची बालकवी

बांदा :

ज्ञानवर्धिनी विद्याप्रसारक मंडळ नाशिक यांच्या वतीने बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे व कवी आनंद जोर्वेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ घेण्यात आलेल्या महाराष्ट्राची बालकवी या स्पर्धेत इयत्ता तिसरी ते पाचवी या गटात बांदा नं. १ केंद्र शाळेची विद्यार्थिनी स्वामिनी लक्ष्मण तर्पे हीने राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश‌ प्राप्त करून महाराष्ट्राची बालकवी हा किताब मिळवला असून स्वामिनीला रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असून या स्पर्धेत महाराष्ट्रातून चारशे विद्यार्थी सहभागी झाले होते. याच बरोबर‌ बांदा शाळेतील तनिष्का देसाई,समर्थ पाटील, मृण्मयी पंडित,गौरी तर्पे याही विद्यार्थ्यांना या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल सहभागी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्वामिनी तर्पे ही मागील वर्षी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय चित्र प्रदर्शनातही सहभागी झाली होती.

स्वामिनीची निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक उर्मिला मोर्ये, केंद्र प्रमुख संदीप गवस, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे, उपाध्यक्ष संपदा सिध्दये यांनी अभिनंदन केले असून या विद्यार्थ्यांना शिक्षक शांताराम असनकर, सपना गायकवाड, जे.डी.पाटील, रंगनाथ परब, स्नेहा गाडी, रसिका मालवणकर, शुभेच्छा सावंत, जागृती धुरी, मनिषा मोरे, प्रदिप सावंत यांचे मार्गदर्शन लाभले. स्वामिनीने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा